अमरावती : मनोरंजन विश्‍वात लोकप्रिय ठरलेल्‍या ‘ब‍िग बॉस’ च्‍या यंदाच्‍या पर्वाचा विजेता कोण, याचा उलगडा अवघ्‍या काही तासांत होणार असताना अमरावतीकरांची उत्‍कंठा शिगेला पोहोचली आहे. खासदार नवनीत राणा, आमदार बच्‍चू कडू यांच्‍यासह अनेक राजकीय नेत्‍यांनी मूळ अमरावतीकर असलेल्‍या शिव ठाकरेला शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. गेल्‍या काही दिवसांपासून समाज माध्‍यमांवर शिव ठाकरेला जेतेपदापर्यंत पोहचविण्‍यासाठी भरघोस मतदान करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

फायनलिस्ट शिव ठाकरेने लोकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. साधेपणा आणि अनोख्या शैलीमुळे शिव ठाकरे चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आज शिव ठाकरे टेलिव्हिजन विश्‍वात ओळखीचा झाला असला, तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी शिवाला खूप मेहनत करावी लागली. शिव छोट्याशा घरात राहत होता. कुटुंबाच्‍या मदतीसाठी त्‍याने वर्तमानपत्र विकण्‍याचेही काम केले. कुटुंबाची बेताची आर्थिक स्थिती पाहून शिवने नृत्याचे वर्ग सुरू केले, तेथून हळूहळू त्याला चांगली कमाई होऊ लागली.

हेही वाचा – राज्यपालांच्या राजीनाम्यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “विरोधकांनी स्वतःची पाठ…”

हेही वाचा – २० फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालये बंद होणार! प्राचार्य फोरम व नुटाचा इशारा, वाचा कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ठाकरे पहिल्यांदा रोडीजमध्ये दिसला. रणविजयपासून ते करण कुंद्रा यांनी शिव ठाकरेचे जोरदार कौतुक केले. रोडीजनंतर, शिव ठाकरे मराठी बिग बॉसमध्ये सामील झाला आणि त्या शोचा विजेता म्हणून नावलौकिक मिळवला. मग काय, या विजयाने मराठी टेलिव्हिजन विश्‍वात शिवचे नाव झाले. त्याच्या कमाईबद्दल सांगायचे तर शिव ठाकरे शो, कोरिओग्राफी आणि रिअ‍ॅलिटी शोमधून चांगले उत्‍पन्‍न मिळवतो. शिव ठाकरे याला जास्‍तीत जास्‍त मतदान करावे, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आवाहन केले. गल्‍लोगल्‍ली प्रार्थना केली जात आहे. अनेकांनी तर होम-हवन, यज्ञाच्‍या माध्‍यमातून आवाहन केले आहे. आता निकालाची प्रतीक्षा केली जात आहे.