नागपूर : सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरूवात केली असून याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यात मतदानापूर्वी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करणे सुरू झाले आहे. यासाठी राजकीय प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

२०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे.जिल्ह्यात रामटेक व नागपूर असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत एकूण ४४६४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतल्या जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून नागपूर जिल्ह्याकरिता १०४५० बॅलेट युनिट, ५९००कंट्रोल युनिट व ५५६० व्हीव्हीपॅट ही नवीन एम ३ मतदान यंत्रे निवडणूक विभागाला प्राप्त झालेली आहेत.

हेही वाचा >>>गर्भातच डोळे मिटलेल्या बाळाचे मृत्यूपश्चात श्वानांनी लचके तोडले; यवतमाळच्या खासगी दवाखान्यातील घटनेने खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व यंत्रांची १ ते २५ ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तपासणी करण्यात येणार आहे. यांकरिता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीकडून २० प्रशिक्षित इंजिनिअरचे पथक आले आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.