भंडारा : भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्ड येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी आपल्या पथकासह सापळा रचून धाड टाकली. यावेळी ४० वर्ष वयाची एक महिला तिच्या राहत्या घरी इतर महिलांना देहविक्री करण्यास प्रवृत्त करताना आढळून आली.

सदर ठिकाणी देहविक्री करण्याचे उद्देशाने २ महिलाना व शारीरिक संबंधांसाठी आलेल्या तीन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम ३, ४, ५ (१) (क) अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून देहविक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या दोन महीलांना सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ताडोबातील वाघांचा करिष्मा पाहून सारेच अवाक; पर्यटकांनी रोखून धरला श्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, अपर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, तुळशिदास मोहरकर, विजय राऊत, प्रशांत कुरंजेकर, अमोल खराबे, श्रीकांत मस्के, राजु दोनोडे पोलीस नायक प्रफुल कठाणे, संदिप भानारकर, अंकोश पुराम, कौशिक गजभिये, अर्चना कुथे, किर्ती तिवारी सर्व स्थानीक गुन्हे शाखा भंडारा यांनी केलेली आहे.