चंद्रपूर : ओबीसी समाजाची ऐसी तैसी उच्चारुण ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या रामदेव बाबा यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आले.

काही दिवसांपासून समाज माध्यमांवर रामदेवबाबा यांची एक ‘क्लिप’ सार्वत्रिक होत आहे. त्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असून ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे. यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामदेवबाबा यांच्या विरोधात आज निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – बिबट्याचा धुमाकूळ; असा लावला सापळा अन्…

रामदेवबाबांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे. बाबांची दुकानदारी या देशातील ६५% ओबीसी समाजाच्या खरेदी विक्री करून चालत आहे याचे भान या भांडवलदारी बाबाने राखावयास पाहिजे, समाजामध्ये सामाजिक गतिरोध निर्माण करुन ओबीसी समाजाविषयी अपशब्द बोलणे टाळले पाहिजे, अन्यथा यांच्या दुकानासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल, असे आंदोलन दरम्यान सांगण्यात आले. रामदेवबाबांनी १५ दिवसांत माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – उपराजधानी नागपूर मध्ये नायलॉन मांजाची धास्ती! उपाययोजनांबाबत जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, ओबीसी योद्धा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, गणेश आवारी, डॉ संजय घाटे, कर्मचारी संघटनेचे देवराव दिवसे, प्रदीप पावडे, रजनी मोरे, अजय बलकी, रोशन पचारे, गोविंदा उपरे, विलास भगत, रंगराव पवार, पवन अगदारी, नागेश बोडे, अतुल मोहितकर,नंदू टोंगे, सुरेश विधाते, रणजित पिंपलशेडे, तुळशीराम देरकर, संतोष बांदूरकर, दिनेश भोंगडे, भास्कर सोनेकर लखन हिकरे इ. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.