नागपूर: होळीच्या दिवशी मटण, चिकनची विक्रमी विक्री वाढली. शुक्रवारी होळीचा आनंद घेणाऱ्यांचा मांसाहारी होण्याचा उत्साह महागडा चिकन आणि मटणाने कमी केला नाही. नियमित किमतीपेक्षा धुलीवंदनाच्या दिवशी जास्त होती. शहरातील विविध भागात चिकन आणि मटणाच्या दुकानांवर रांगा लागल्या होत्या आणि ते होळीच्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले. विशेष म्हणजे नागपुरात  धुळीवंदनाच्या दिवशी जवळपास १५ हजाराहून अधिक बोकड कपल्याची माहिती मोमीनपुरा येथील एका व्यापाऱ्याने दिले तर इंडियन बॉयलरच्या खान यांनी सांगितले की मटणापेक्षा चिकनाला अधिक मागणी होती. आज शुक्रवार असल्याने जवळपास दहा टणाहून अधिक चिकन विकल्याची माहिती त्यांनी दिली.

होळीच्या आदल्या दिवशी राज्यात सर्वत्र होलीका दहनाचा कार्यक्रम होतो. यावेळी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. दुसऱ्या दिवशी सर्वजण रंग खेळतात. रंग खेळत असताना यासोबत अनेक व्यक्ती मांसाहार करतात. त्यामुळे आजा बाजारात सर्वत्र मटन विक्री सुरू आहे.

नागपूरकरांनी तर मटन आणि चिकन दुकानाबाहेर  मोठी रांग लावली आहे. मस्त मटनावर ताव मारत नागरिकांना होळी साजरी करायाची आहे. आज रंगपंचमीमुळे मटणाच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. मटनाच्या दरात प्रति किलो १०० रुपयाने वाढ झाली आहे.

मटनाचे भाव वाढले

होळी सणामुळे राज्यात अनेक ठिकाणी मटनच्या दरात २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपुरात मटन ९०० रुपये किलो मिळत आहे. अन्य दिवशी मटन ७०० तर काही ठिकाणी ६५० रुपये प्रति किलो विकले जाते. मात्र धुळवडीमुळे मटन आणि चिकन विक्रेत्यांनी भाव वाढवलेत. भाववाढ झाली असली तरी देखील मटन खरेदीदीसाठी शॉप बाहेर मोठी गर्दी झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटेपासून मटणाच्या दुकानांवर रांगा

धुळीवंदनानिमित्त शुक्रवारी मटण आणि चिकनच्या दुकानावर पहाटे पाच वाजतापासून लोकांच्या रांगा दिसून आल्या. शुक्रवार हा दिवस सर्वांनाच नॉनव्हेज खाण्यासाठी योग्य असल्याने शुक्रवारी नागपूरत विक्रमी मागणी वाढली होती. त्याचा फायदा घेत दुकानदारांनी दर वाढवले होते.