नागपूर : रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम उघडली असून विनातिकीट तसेच सामान्य तिकिटावर शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे.अनियमित प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने नुकतीच तिकीट तपासणी मोहीम राबण्यात आली. नागपूर स्थानकावर ७ मे रोजी तपासणी करण्यात  आली. या मोहिमेमध्ये वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले.

हेही वाचा >>> तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला अन् वाघाची शिकार झाला

या कारवाईदरम्यान एकूण ९२६ प्रवाशांना तिकिटांशिवाय प्रवास करणे किंवा अनियमित प्रवासाच्या पद्धतींसह विविध उल्लंघनांसाठी पकडण्यात आले. या तपासाअंती एकूण  ५,४२, ६८५ रुपये प्रवाशांकडून वसूल करण्यात आले. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४/१४७ अंतर्गत सात अनधिकृत विक्रेते/फेरीवाल्यांना अटक करण्यात आली. रेल्वे परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वाणिज्य विभाग आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली. नागपूर विभाग प्रवाशांची सुरक्षितता आणि सोई सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि रेल्वे सेवेची अखंडता राखण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत.या अलीकडील ऑपरेशनच्या यशानंतर, नागपूर विभाग रेल्वे भविष्यात अशाच प्रकारच्या मोहिमेचे आयोजन करत राहण्याच्या आपल्या इराद्यावर जोर देते. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवास करणाऱ्या जनतेला तिकीट नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.