अकोला : पुणे आणि हटियाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मनस्ताप व अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तांत्रिक कामामुळे हटिया-पुणे-हटिया एक्सप्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राउरकेला स्थानकातील ‘यार्ड इंटरलॉकिंग’ कामामुळे हटिया-पुणे- हटिया एक्सप्रेसची दोन्ही बाजूची फेरी रद्द करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबरला हटिया येथून सुटणारी गाडी क्र. २२८४६ हटिया-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी मंगळवारी दुपारी २.४० अकोला स्थानकावर येणार नाही. तसेच गाडी क्र. २२८४५ पुणे-हटिया एक्सप्रेस ११ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकावरून सुटणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2023 रोजी प्रकाशित
पुणे आणि हटियाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अडचण होणार, कारण…
पुणे आणि हटियाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मनस्ताप व अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तांत्रिक कामामुळे हटिया-पुणे-हटिया एक्सप्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
अकोला

First published on: 10-10-2023 at 11:44 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway passengers going to pune and hatia will face difficulty ppd 88 ysh