नागपूर : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून काही भागांत उन्हाचा तडाखा, तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून म्हणजेच २३ जूनपासून राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यातील काही भागांत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

हेही वाचा – भंडारा : बंद घरात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला

जून महिना सुरू होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात. यावेळीदेखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली आहे, पण तरीही पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागसह तज्ञांनी केले आहे.

हेही वाचा – भरमसाठ वीज देयक आले, आपणच आपले देयक तपासा… पद्धत काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठवाड्यात २३ ते २९ जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. तर २५ जून ते एक जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.