लोकसत्ता टीम
गोंदिया : राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी गोंदियात आयोजित एका फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केला.
आणखी वाचा-‘या’ मार्गावरील तब्बल ३५ रेल्वे गाड्या रद्द, कारण…?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या रॅम्प वॉकमध्ये विदर्भातून व जवळील छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश राज्यातून सुद्धा स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन सोहळा आणि रॅम्प वॉक चा कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक महिलांनी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वर्षा पटेल यांना रॅम्प वॉक करण्याचा आग्रह केला असता त्या रॅम्प वर चालण्याचा मोह आवरु शकल्या नाहीत.