विधानपरिषेदच्या पाच जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांच्या पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात भाषण दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, रणजीत पाटील यांनी पदवीधरांचा मेळावा आयोजित केला होता, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना रणजित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – नागपूर: आज मतदान, ३९ हजारांवर शिक्षक आज विधान परिषदेचा प्रतिनिधी निवडणार; २२ उमेदवार रिंगणात

काय म्हणाले रणजीत पाटील?

“काल महेश भवन येथे पदवीधरांचा मेळावा नव्हता, तर अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांचं निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मी सुद्धा हजर होतो. त्यामुळे हा पदवीधरांचा मेळावा होता, असं म्हणणं चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया रणजीत पाटील यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra MLC Election Results Live: सत्यजीत तांबेंच्या विजयाबाबत शिंदे गटाला विश्वास, दीपक केसरकर म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “विरोधकांकडे बोलण्यसाठी आता मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे ते अशा पद्धतीने रडीचा डाव खेळत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असेल म्हणून श्रद्धांजलीच्या कार्यक्रमालाही ते सोडायला तयार नाहीत. त्याला सुद्धा त्यांनी राजकारणाचं स्वरूप दिलं आहे. इतकी खालची पातळी जर विरोधकांनी गाठली असेल, तर हे चुकीचं आहे. मी अमरावतीत गेल्यानंतर याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन प्रतिक्रिया देईल”, असेही ते म्हणाले.