लोकसत्ता टीम

नागपूर : तरुणी बेरोजगार युवकाच्या प्रेमात पडली. प्रेमप्रकरणाची चर्चा तरुणीच्या भावाच्या कानावर गेली. चिडलेल्या भावाने बहिणीला चांगला चोप दिला. तिने कळमना पोलीस स्टेशन गाठले. प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

अज्जू शेख (वय २४, रा. कळमना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २१ वर्षीय तरुणी पदवीला शिकत आहे. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहेत. आरोपी अज्जू नेहमीच पाठलाग करायचा. त्यामुळे त्यांची ओळख होऊन त्यांच्यात मोबाईलवर बोलणे सुरु झाले.

आणखी वाचा-नागपूर : मजुराच्या बँक खात्यातून दोन कोटींची उलाढाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमीष दाखविले. आरोपीने २२ मे ते ४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान तिला अनेकदा आपल्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. एकदा ही तरुणी आरोपीसोबत हॉटेलमध्ये गेली असता तिच्या भावाच्या मित्राने बघितले. त्याने तरुणीच्या भावाला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर भावाने विचारना केल्यानंतर तरुणीने आपबिती सांगितली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.