नागपूर : विवाहित असलेल्या ३० वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. चैत्रराम सेलोकर (३४, बेला. जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला ही भंडारा शहरात राहते. तिची ओळख आरोपी चैत्रराम याच्याशी झाली. दोघेही विवाहित आहेत. मात्र, एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर कौटुंबिक वादातून दोघांचाही संसार विस्कटला. चैत्ररामने पत्नीशा वाद घालून घरातून हाकलून दिले. त्यानंतर चैत्ररामने महिलेला पतीपासून विभक्त होण्यासाठी तगादा लावला.

हेही वाचा – अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ४३ टक्‍के पाणीसाठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान महिलेचा पती घरी नसताना चैतराम हा महिलेच्या घरी जात होता. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. प्रेमसंबंध वाढल्यानंतर महिलेनेही आपल्या पतीला सोडून दिले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने महिलेला रामटेकला देवदर्शनासाठी आणले. रामटेकमधील पराग रेस्टॉरेंटमध्ये नेले. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे महिलेने पोलिसात बलात्कार केल्याची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.