नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत पार पडलेल्या २०२२-२३ या शैक्षणिक सत्राच्या परीक्षांतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके वितरण सोहळा शुक्रवार २ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पाण्डे  उपस्थिती राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च दीक्षाभूमी नागपूर येथील विद्यार्थी प्रणय आनंद पवार याने याने एमबीए परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ७ सुवर्णपदके प्राप्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील विद्यार्थी ज्ञानेश्वर भागवत नेहरकर याने बी.ए. एल.एल.बी. (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके व २ पारितोषिके प्राप्त केले आहे.

या सोहळ्यात संलग्नित महाविद्यालयातील एकूण १०१ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये १४२ सूवर्ण पदके, ८ रौप्य पदके व २५ पारितोषिके आदी एकुण १७५ पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच नागपूर विद्यापीठाच्या स्वायत्त विभागातील ४४ विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके वितरित केले जाणार आहे. यामध्ये ५३ सुवर्णपदके व एक पारितोषिके आदी एकूण ५४ पुरस्कारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>मराठाप्रमाणे आता ईडब्ल्यूएस सर्वेक्षणाची मागणी का होतेय? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थिनी मेघा तेजवंत पोटदुखे हिने एम.ए. (मराठी) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके व १ पारितोषिक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग येथील बहि:शाल विद्यार्थी सचिन चरणजी देव एम.ए. (बुद्धिस्ट स्टडीज) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके प्राप्त केले आहे. डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी अजय अरविंद खोब्रागडे याने एम.ए. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक प्राप्त केले. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या स्वायत्त पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी प्राची हरीश त्रिवेदी हिने ४ सुवर्णपदके प्राप्त केले. स्वायत्त पदव्युत्तर औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थिनी स्नेहा संजय वट्टे हिने ३ सुवर्णपदके तर पदव्युत्तर शिक्षण विभागातील निखिल विनायक इंगळे याने ३ सुवर्णपदके प्राप्त केली आहे.