वर्धा: राज्यभरातील सहकार खात्याच्या कार्यालयात विविध पदांसाठी सरळ सेवेने पद भरती केल्या जाणार आहे.इच्छुकांना ७ ते २१ जुलै दरम्यान अर्ज दाखल करता येईल.विभागीय सहनिबंधक, लेखा परीक्षक,सहकारी अधिकारी,वरिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक अशी सुमारे ३०९ पदे भरल्या जाणार आहेत. नऊ विभागीय कार्यालयांच्या आस्थापनेत ही पदे आहेत.पात्र उमेदवारांनी सहकार आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे.२१ जुलै नंतर ही लिंक बंद होणार.

भरती साठी ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल.या परीक्षेची तारीख सहकार विभागाच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. संकेतस्थावरील वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेवून कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनाच घ्यायची आहे.