लोकसत्ता टीम

नागपूर : मैत्रिणीला फिरायला घेऊन नेल्यानंतर शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे युवकाने आत्महत्येची धमकी देऊन बलात्कार केला. तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितली. तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला. करण विनायक बिरजारक (सावंगी) असे आरोपीचे नाव आहे.

सावनेरमध्ये राहणारी १७ वर्षीय तरुणी ही बाराव्या वर्गात शिकते. तिची इंस्टाग्रामवरून करण बिरजारक या युवकाशी ओळखी झाली. दोघांचे काही दिवस चॅटिंग सुरु होती. त्यानंतर दोघांची सावनेरच्या उद्यानात भेट झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. बांधकाम ठेकेदार असलेल्या करणने तिला फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडण्यास सांगितले. २७ जुलैला दोघेही दुचाकीने फिरायला गेले. दुपारी तिला नाश्ता करायला जात असल्याचे सांगून लॉजवर नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने संबंधासाठी नकार दिला. त्यामुळे करणने तिचीच ओढणी घेऊन लॉजमधील पंख्याला बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली.

आणखी वाचा-क्रौयाची सीमा! अल्पवयीन पीडितेच्या गुप्तांगाला चटके, अनैसर्गिक अत्याचार, डॉक्टरांच्या अंगावर आला काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करणने आत्महत्या केल्यास गुन्हा दाखल होऊन पोलीस अटक करतील, या भीतीपोटी शारीरिक संबंधास होकार दिला. करणने यावेळी काही छायाचित्र त्या तरुणीचे काढले होते. त्यामुळे तो तिचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता. तरुणीची परीक्षा असल्यामुळे तिने शारीरिक संबंधासाठी नकार दिला असता त्याने बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी करणवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.