वर्धा : नियम न पाळल्यास दंड ठोठावण्याचा प्रकार सर्वमान्य आहे. मात्र तो दंड किती असावा, याचीपण मर्यादा असते. वैद्यकीय क्षेत्रात सावधानता पाळणे अती आवश्यक समजल्या जाते. पण कोटीचा दंड? हो तर. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगातर्फे (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. ती न पाळल्यास मोठी दंडात्मक कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे.

दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी यास दुजोरा दिला. म्हणजे एका चुकीसाठी एक कोटी रुपये दंड पडणार. तर चूक घडल्यास प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, संचालक, डॉक्टर यांना पाच लाख रुपयांचा दंड पडेल. वैद्यकीय आयोगाच्या वैधानिक तरतुदींचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयाची मान्यता पाच शैक्षणिक वर्षांपर्यंत रोखून धरल्या जावू शकते.

हेही वाचा – नागपूर : ‘त्या’ अपहृत सुपारी व्यापाऱ्याचा लागला शोध

हेही वाचा – अकोला : ई-पीक प्रकरणात मुख्यमंत्री, मंत्र्यांना बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदवी व पदव्युत्तर परीक्षा मंडळ तसेच आयोगावर दबाव आणण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. रुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा तपासण्या, अध्यापन पद्धत, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण याचे काही मानक आहेत. ते पाळावे अथवा दंडाला सामोरे जावे, असे खबरदार करण्यात आले आहे.