scorecardresearch

कुणाल रुग्णालयात तोडफोड ; उपचार करण्यास उशीर केल्यामुळे उद्रेक

डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत उपचार करण्यास उशीर केल्यामुळे एका युवकाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत उपचार करण्यास उशीर केल्यामुळे एका युवकाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास मानकापुरात घडली. राहुल बलराम इवनाते (२८, श्रीकृष्णधाम वस्ती) असे मृत युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, छातीत दुखत असल्यामुळे राहुल इवनाते याला गुरुवारी सकाळी मानकापुरातील कुणाल रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच तपासणी करून राहुलला डॉक्टरांनी मृत घोषित केले. राहुलच्या काही मित्रांनी डॉक्टरांना ईसीजी रिपोर्टची मागणी केली. रुग्णालय प्रशासनाने कुण्यातरी महिलेचा अहवाल त्यांना दाखवला. अहवाल चुकीचा असल्याचे डॉक्टरांना लक्षात आणून दिले. त्या अहवालावर अन्य महिलेचे नाव खोडून राहुलचे नाव लिहिण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांनी केला.

पुन्हा केला ईसीजी

राहुलला मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांना संशय आल्याने पुन्हा ईसीजी करण्यास सांगितले. त्यावेळी राहुल जिवंत असल्याचे लक्षात आले. नातेवाईकांनी लगेच राहुलला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उशिर केल्याचे सांगून डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केल्याचा दावा नातेवाईकांनी केला.

रुग्णालयाची तोडफोड

कुणाल रुग्णालय प्रशासनाच्या चुकीने राहुलचा जीव गेल्याचा आरोप करीत नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यानंतर रुग्णालयाची तोडफोड केली. मानकापूर पोलिसांनी तक्रारीवरून तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relatives of victim vandalise kunal hospital in nagpur zws