नागपूर जिल्हा तृतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती रोडावली आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
जिल्ह्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तृतीय श्रेणी महसूल कर्माचरी अधिक प्रमाणात आहेत. कर्मचारी जरी तृतीय श्रेणीतील असले तरी ते सांभाळत असलेले टेबल महत्त्वाचे असतात. साहेबांना वेळोवेळी लागणारी माहिती पुरवण्याचे काम करतात. ते संपावर गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध महसूल विभागाशी सौबधित कार्यालयातील कर्मचारी एक हजार ते १५०० आहेत हे येथे उल्लेखनीय.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ इटनकर यानी संप अवैध ठरवत कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे