अकोला : जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर दोन लाख ७० हजार शेतकऱ्यांना २५५ कोटी १५ लाख ६७ हजारांची मदत वितरण करण्यात आले. सोबतच अतिवृष्टी व पुरामुळे बाधित दोन लाख २१ हजार ७०७ शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाण्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये प्रमाणे १९१ कोटी ४३ लाखाचे डीबीटी पद्धतीने मदत वितरण झाले.

अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदत व सवलती जाहीर केल्या. ऑगस्टमधील अतिवृष्टीने शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी एक लाख एक हजार ५६० शेतकऱ्यांना ७७ कोटी ३४ लाख ९९ हजारांचा निधी वाटप झाला. यामध्ये अकोट २१ हजार २५४ शेतकऱ्यांना १३ कोटी १४ लाख, तेल्हारा सहा हजार ४१७ शेतकऱ्यांना दोन कोटी ९२ लाख, बाळापूर ७६६ शेतकऱ्यांना ४४ लाख, पातूर दोन हजार ७९६ शेतकऱ्यांना एक कोटी ५९ लाख, अकोला ३५ हजार १४५ शेतकऱ्यांसाठी ३० कोटी ९३ लाख, मूर्तिजापूर ३५ हजार १८२ शेतकऱ्यांना २८ कोटी ३१ लाखाचे वितरण केले.

सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक लाख ६८ हजार ९३२ शेतकऱ्यांना १७७ कोटी ८० लाख ६८ हजाराच्या निधीचे वाटप झाले. अकोट २१ हजार १७५ शेतकऱ्यांना २५ कोटी १६ लाख, तेल्हारा २७ हजार ३३३ शेतकऱ्यांना २४ कोटी ४४ लाख, बाळापूर ३३ हजार ५८८ शेतकऱ्यांना २६ कोटी ८८ लाख, पातूर २४ हजार ९२५ शेतकऱ्यांना २२ कोटी ४१ लाख, अकोला १४ हजार ११ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख, बार्शीटाकळी ३१ हजार ५८५ शेतकऱ्यांना २९ कोटी चार लाख व मूर्तिजापूर १६ हजार ३१५ शेतकऱ्यांना ३८ कोटी ४६ लाखाचे वितरण झाले.

रब्बी हंगाम बियाण्यांसाठी १९१ कोटींची मदत

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्चासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये प्रमाणे डीबीटी पद्धतीने मदत वितरण दोन लाख २१ हजार ७०७ शेतकऱ्यांना १९१ कोटी ४३ लाखाची मदत करण्यात आली आहे. यामध्ये अकोला ३७ कोटी ३५ लाख, अकोट २७ कोटी १९ लाख, बाळापूर २८ कोटी ७४ लाख, बार्शीटाकळी २७ कोटी ५१ लाख, मूर्तिजापूर २८ कोटी ६२ लाख, पातूर १९ कोटी ८५ लाख व तेल्हारा तालुक्यात २२ कोटी १२ लाखाचे वितरण केले.