लोकसत्ता टीम

बुलढाणा : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या व राज्यातील मोठ्या यात्रेपैकी एक असलेल्या बुलढाणा तालुक्यातील सैलानी महायात्रेस महाहोळीने यात्रेचा औपचारिक प्रारंभ झाला. यानिमित्त पाच ट्रक नारळाची होळी पेटविण्यात आली. करोनामुळे मागील तीन वर्षे यात्रा न भरल्याने यंदा जमलेल्या लाखांवर सर्वधर्मीय भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

आणखी वाचा- रेल्वे मालगाडीच्या इंजिनवर आढळला बिबट्याचा मृतदेह; वन व रेल्वे खात्यात खळबळ

या होळीसाठी सैलानी बाबा दरगाह परिसरातील एका शेतात जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा खोदण्यात आला होता. माजी सरपंच मुजावर शेख रफिक मुजावर, पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर, सैलानी बाबा ट्रस्ट चे शेख अब्दुल समद आदी मान्यवरांसह लाखावर भाविकांच्या साक्षीने नारळांची होळी प्रज्वलित करण्यात आली. दक्षतेचा भाग म्हणून अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते. यात्रेनिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबासाहेब महामुनी, तहसीलदार रुपेश खंडारे आदी हजर होते.

आणखी वाचा- खामगावात ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट’ केंद्राला मान्यता, कोलकाता केंद्राच्या धर्तीवर होणार उभारणी; जखमी वन्यप्राण्यांवर होणार उपचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदल मुख्य आकर्षण

दरम्यान १२ मार्चला रात्री निघणारा संदल यात्रेचे मुख्य आकर्षण राहते. पिंपळगाव सराई येथून निघणारा हा संदल सैलानी बाबा दरगाह येथे पोहचल्यावर संदल चढविण्यात येतो.