अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले,  अशी टीका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे  गुरूजी यांनी येथे केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यवतमाळ विभागाच्या वतीने आज शनिवारी स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

हेही वाचा >>> Buldhana Travels Accident: सर्व मृत हिंगोली जिल्ह्यातील, २० जखमींवर बुलढाण्यात उपचार; नागपूरकर महिला व चालकाचाही समावेश

शुक्रवारी अमरावती येथे महात्मा गांधींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संभाजी भिडे आज यवतमाळात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी आजच्या व्याख्यानात महात्मा गांधींसंदर्भात भाष्य करणे टाळले. त्याऐवजी व्याख्यानाच्या ओघात अखंड हिंदुस्थानाच्या प्रेमावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य केले. नेहरूंना हिंदुस्थानाप्रती कोणतेही प्रेम नव्हते. देशासाठी नेहरूंचे नखभरही योगदान नसताना ते पंतप्रधान झाले, याचे शल्य त्यांनी व्यक्त केले. नेहरूंनी चीनसोबत केलेला ‘पंचशील’ करार हिंदुस्थानाला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने भारताचा पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला, असा आरोप त्यांनी केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळाच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, यवतमाळ अर्बन बँकचे अध्यक्ष अजय मुंधडा आदींसह संघ परिवारातील असंख्य नागरिक, १८ ते ३० वयोगटातील तरूण, तरूणींची मोठी गर्दी होती.

हेही वाचा >>> VIDEO: World Tiger Day: ताडोबातील ‘जुनाबाई’ आणि ‘डागोबा’चे ‘नांदू सौख्य भरे’; बछड्यांसह पर्यटकांना देतात दर्शन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमस्थळाला छावणीचे रूप भिडे यांच्या यवतमाळ येथील व्याख्यानाला अनेक सामाजिक, पुरोगामी, आंबेडकरवारी संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यांचे शहरात लागलेले बॅनर, पोस्टर फाडले. कार्यक्रमस्थळी अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बिपीन चौधरी, सुरज खोब्रागडे, प्रा. घनश्याम दरणे, प्रमोदिनी रामटेके, संगीता पवार आदी असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भिडेंच्या व्याख्यान परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.