scorecardresearch

Premium

संग्रामपुर बाजार समिती सभापतीची निवड बिनविरोध; सभापती सेनेचा, उपसभापती काँग्रेसचा

संग्रामपूर बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठीची निवडणूक अविरोध झाली.

Sangrampur Bazaar Committee Chairman elected unopposed
निकाल जाहीर झाल्यावर महायुतीतर्फे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

बुलढाणा : संग्रामपूर बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठीची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदी शिवसेना (शिंदे) चे शांताराम दाणे तर उप सभापतीपदी काँग्रेसचे सुरेश तायडे यांची अविरोध निवड झाली. निकाल जाहीर झाल्यावर महायुतीतर्फे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

chandrapur independent mla kishor jorgewar marathi news, mla kishor jorgewar shivsena marathi news
अपक्ष आमदार जोरगेवार यांचं ठरलं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानात सांगितलं; शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणूक लढणार?
rajyasabha (1)
सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याऐवजी राज्यसभेत जाण्याचा निर्णय का घेतला? काँग्रेससाठी हे फायद्याचे कसे ठरेल?
Baba Siddiqui
बाबा सिद्दीकी : मुंबई काँग्रेसचा निष्ठावान अल्पसंख्याक चेहरा
sharad pawar group holds mundan protest
पिंपरीत शरद पवार गटाचे निवडणूक आयोगा विरोधात मुंडन आंदोलन; कार्यकर्तेही आक्रमक

आज, रविवारी बाजार समितीत अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक महेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. युतीतर्फे दाणे व तायडे या दोघांचेच अर्ज सादर करण्यात आले तर आघाडीने अर्ज सादर करण्याचे टाळले. यामुळे निवड अविरोध झाल्याचे कृपलानी यांनी जाहीर केले.

आणखी वाचा-खासदार प्रफुल पटेल हे इकबाल मिर्चीचे ‘पार्टनर’, राष्ट्रवादीचे किरण अतकरी यांच्या वक्तव्याने खळबळ

आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या शेतकरी विकास पॅनेल ने संचालकांच्या एकूण १८ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे युतीने दोन्ही जागी अविरोध बाजी मारली. दरम्यान, भाजपकडे अनेक सक्षम उमेदवार होते. मात्र, भाजप आमदार संजय कुटे यांनी भावी राजकारण व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मित्र पक्षाला सभापती पद दिले. उपसभापती पद काँग्रेसला देऊन त्यांनी आघाडीला तडा दिला. यातच बाजार समितीची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी पाच वर्षांची डोकेदुखी भाजपपासून ‘सुरक्षित अंतर’वर ठेवल्याचे मानले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangrampur bazaar committee chairman elected unopposed scm 61 mrj

First published on: 10-12-2023 at 18:53 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×