बुलढाणा : जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. यापैकी दोघांचा घटनास्थळीच तर एका व्यक्तीचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.मृतका मध्ये २ पुरुष व १ महिलेचा समावेश आहे तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

संग्रामपूर तालुक्यातील एकलारा वरवट मार्गावर दोन दुचाकीची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. गुरुवारी रात्री उशिरा ही दुर्दैवी दुर्घटना घडली.वरवट बकाल येथुन दुचाकीने दोघेजण बावनबीर कडे जातं होते. पाळोदी येथील रहिवासी दुचाकीने टूनकी येथे एका नातेवाईक महिलेच्या अंत्यसंस्कार विधीला उपस्थित राहून नंतर पाळोदी ( जिल्हा अकोला ) कडे जातं होत होते. दरम्यान एकलारा वरवट रसत्यावर भरवेगात जाणाऱ्या या दोन दुचाकीची आमनेसामने धडक झाली.

अजय लहासे (राहणार बावनबीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा), गणेश ढोले , रुख्माबाइ विष्णु नवले (राहणार पाळोदी जिल्हा अकोला ) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहे. या भीषण अपघातात शिवा पुंडलीक घुले , राहुल जवंजाळ , महादेव नांदोकार, हे तिघेजण गंभीर जखमी झाले. यापैकी शिवा पुंडलीक घुले याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचार साठी अकोला येथे दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी संगितले. या प्रकरणी संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

घटनेचा तपास तामगांव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या भीषण अपघाताने संग्रामपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून एन गणेश उत्सव काळात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.