शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपुरात आहेत. त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलंय. शिवाय, “मला जे काही जाहीर करायचं असेल ते मी नागपूरमध्ये येऊनच जाहीर करेन. मी दोन वर्षांनी अधिवेशन काळानंतर नागपूरला आलो आहे. या दोन वर्षांत नागपुरात खूप काही बदल झाला आहे. करोना काळात मी येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय. येत्या काळात निवडणुका वगैरे आहेच, पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला इथं यावे लागणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावर संजय राऊतांनी पलटवार देखील केला. परंतु यातच त्यांनी दोन-तीन वेळा किरीट सोमय्यांना शिवी दिली होती. यावरून किरीट सोमय्यांसह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त करत ही भाषा योग्य नसल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेल तर त्याची आरती करावी, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊतांनी शिवी दिल्यासंबंधी विचारलं असता सोमय्या म्हणाले; “माझ्या आईला संताप नको, एकदाच काय ते…”

याशिवाय महाराष्ट्रातल्या लोकांना कुणीही मराठी शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. “चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल, तर लोकशाहीत नक्कीच त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. पण काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही,” असंही ते म्हणाले.

पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…”

“जे महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं, असं आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. ‘हजारो मारावे एक उरावा,’ अशा पध्दतीचं राजकारण काही भाजपाचे नेते करीत आहेत. अशा लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp over targeting him for abusive language for kirit somayya hrc
First published on: 21-02-2022 at 08:39 IST