scorecardresearch

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे निधन झाले.

Dr Dilip Malkhede
डॉ. दिलीप मालखेडे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. त्‍यांच्‍यावर पुणे येथील रुग्‍णालयात उपचार सुरू होते.

डॉ. दिलीप मालखेडे यांची ११ सप्‍टेंबर २०२१ रोजी कुलगुरूपदी नियुक्‍ती करण्‍यात आली होती, त्‍यावेळी ते पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विषयाचे प्राध्‍यापक होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत ‘सीबीसीएस’ (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्‍यांच्‍याच नेतृत्‍वात घेण्‍यात आला होता. रोजगाराभिमुख अभ्‍यासक्रम तयार करण्‍यासाठी त्‍यांनी पुढाकार घेतला होता. त्‍यांच्‍या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी शोकसंवेदना व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 09:04 IST
ताज्या बातम्या