स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ठरली लक्षवेधी
बुलढाणा : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून चिखली नगरीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात सोमवारी जुन्या गावातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. महाले यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
हेही वाचा >>> श्रीरामाच्या पुतळ्याला तिरंगा अर्पण, हाती दिले संविधान; नाशकातील वेदोक्त प्रकरणाचा अभिनव निषेध
हातात विविध फलक घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करत, राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी “होश मे आओ, राहुल गांधी होश मे आओ”, “सावरकजी अंगार है, बाकी सब भंगार है”, “देशभकतो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान”, आदी घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.