नागपूर : चित्रपट अभिनेता होण्यासाठी मुंबईला निघालेल्या तीन अल्पवयीन मुलांना लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेजारी राहणारे तिघेही  आठवी आणि नववीत शिकतात. सोमवारी नेहमीप्रमाणे तिघेही सकाळी ११ वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले.  एका विद्यार्थाने घरून तीन हजार रुपये घेतले. तिघेही नागपूर रेल्वेस्थानकावर आले. त्यांनी नागपूर ते मुंबईचे तिकीट घेतले. त्यांनी स्थानकावरील उपाहारगृहात जेवण केले. शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी बघून एका तिकीट तपासणीला संशय आला. त्यांनी त्या मुलांची विचारपूस करून त्यांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीकडे दिले. सहायक निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवि वाघ यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली, असा ते मुंबईला चित्रपट अभिनेते बनण्यासाठी जात असल्याचे समजले. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School children who went to be an actor turned back home zws
First published on: 09-07-2019 at 07:04 IST