वाशीम: जिल्ह्यात वितरीत होत असलेल्या शाळेत पोषण आहारातील डाळ व चटणी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर पोलीस कारवाई करावी, अशी मागणी केली.

त्यांनी चक्क सभागृहात निकृष्ट डाळ व खिचडी आणल्याने अधिकाऱ्यांची एकच चांगलीच धांदल उडाली. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर पोलीस कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी सभागृहात केली असता चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र जिल्ह्यात निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या दालनात निकृष्ट डाळ व चटणी नमुन्याची आज चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>चोरांची हिंमत वाढली! नागपुरात चक्क पोलिसाच्या घरी चोरी

जिल्ह्यात कंत्राटदाराकडून पुरवठा होत असलेल्या पोषण आहारातील साहित्यांची तपासणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. मात्र, साहित्याची तपासणी होत असेल तर निकृष्ट साहित्य वितरीत होतेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.