नागपूर : नागपूरी संत्री जगात प्रसिद्ध असून त्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा म्हणून सातत्याने संशोधन केले जाते आहे. अशाच एका प्रयत्नातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनातून एक प्रजाती विकसित केली आहे. त्यामुळे संत्री दीडपट अधिक रसाळ झालेली आहे.

विविध संशोधन संस्था, विद्यापीठ संत्र्याची चव, रंग, रसाळता, उत्पादकता आणि बिजमुक्त आदी बाबत संशोधन करीत आहेत. त्याचा मूळ उद्देश शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, ते वाणिज्यिक दृष्ट्या व्यवहार्य करणे आणि ग्राहक उपयोगी करणे आहे. त्यातून एक नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. पीडिकेव्हीच्या फळ विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डाॅ. दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वाखाली चमूने संत्र्याची एक प्रजाती एशियन सिट्रस काॅंग्रेसच्या प्रदर्शनात सादर केली. या प्रजातीचे नाव पीडीकेव्ही मॅंडेरिन आहे.

हेही वाचा – ‘एनएचएम’च्या कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले, आरोग्यमंत्र्यांना आश्वासनांचा विसर; सोमवारपासून मुंबईत…

याशिवाय या शास्त्रज्ञांच्या चमूंनी लिंबूच्या तीन नवीन प्रजाती तयार केल्यात आहेत. त्याला पीडीकेव्ही बहार, पीडीकेव्ही चक्रधर व पीडीकेव्ही तृप्ती असे नाव देण्यात आले आहे. यातील बहार लिंबू व संत्रा हे देशभरातील वेगवेगळ्या भागातून निवड केले आहे. तर पीडीकेव्ही चक्रधर व पीडीकेव्ही तृप्ती या प्रजाती गुणसुत्रीय बदल (म्युटंटद्वारे) करून विकसित केले आहे. त्यांना या प्रजाती १५ ते २० वर्षांच्या अथक संशाेधनातून मिळाल्या आहेत. देशाच्या वेगवेळ्या ठिकाणाहून गाेळा केलेल्या प्रजातीतून निवडलेल्या सर्वाेत्तम प्रजातीपैकी असल्याचे डाॅ. पैठणकर म्हणाले. यापैकी संत्र्याची प्रजातीची महाराष्ट्र आणि इतर राज्यांत ५०० एकरापर्यंत लागवड हाेत असून बहार लिंबूची गुजरात, मध्य प्रदेश, काेलकाता व दिल्लीसह पाच हजार एकरात लागवड केली जात आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस म्हणतात, “जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडीकेव्ही मॅंडेरिन : फळ झाडांच्या मधोमध लागतात. सध्या उपलब्ध संत्र्यापेक्षा हे फळ दीडपट अधिक रसाळ आहे. चव गोड आहे, बसकट व बट्टीदार फळे येतात व आकारही माेठा असताे. आंबिया बहारात बिजमुक्त फळ असतो तर मृग बहारात बिजयुक्त फळ येतात.