लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप व शिंदे गटाच्या बहुतांश आमदारांनी गुरुवारी रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट दिली मात्र भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र स्मृती मंदिर परिसरात दांडी मारली. शिवाय आशिष देशमुख. शिंदे गटाचे निलेश राणे यांनी मारलेल्या दांडीची चर्चा परिसरात अधिक रंगली.

विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या काळात दरवर्षी भाजपचे सदस्य स्मृती मंदिर परिसर भेट देत असतात. यावर्षी भाजपसह महायुतीच्या सर्व आमदारांना अधिवेशन सुरू पत्र देत निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या सर्व आमदारांनी स्मृती मंदिर परिसरात भेट देणे आवश्यक असताना राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे, आशिष देशमुख, शिंदे गटाचे निलेश राणे, भरतशेठ गोगावले यांच्यासह भाजपचे २० आमदार व शिंदे गटाचे १० आमदार स्मृती मंदिराकडे फिरकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व आमदारांनी आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. दरवर्षी स्मृती मंदिर परिसराला भेट देणाऱ्यादी यादी तयार केली जाते मात्र यावेळी अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यावेळी महर्षी व्यास सभागृहात संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी संघाच्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली.

आणखी वाचा-कर्नाटकातील सरकारवर बेळगाववरून हल्लाबोल, शंभूराज देसाई म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपस्थित आमदारांबाबत पक्षाचे प्रवीण दरेकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, प्रत्येक आमदाराना निमंत्रण दिले जाते. मात्र काही सदस्यांनी वैयक्तिक अडचणींमुळे अनुपस्थित राहणार नसल्याचे आधीच पक्षातील वरिष्ठांना कळवले आहे. जे आमदार आले नाही ते आज किंवा उद्या भेट देतील असही दरेकर म्हणाले. अजित पवार गटाचे आमदार का आले नाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.