गरीब कुटुंबातील एका मुलामध्ये ‘थॅलेसेमिया’चे निदान झाले.  रक्त संक्रमणातून मुलाला ‘एचआयव्ही’ची बाधा झाली. वयाच्या सात वर्षांपर्यंत वेदना सहन करणाऱ्या मुलावर ‘थॅलेसेमिया’ आणि ‘सिकलसेल’ केंद्राचे संचालक डॉ. विंकी रुघवाणी यांनी उपचार केले. मुलावर मुंबईत यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपण झाल्याने मुलगा आता ‘थॅलेसेमिया’मुक्त झाला आहे. परंतु, त्याच्यावर ‘एचआयव्ही’चे उपचार पुढेही चालणार आहे.

हेही वाचा >>> सावधान! मुंबईतील ड्रग्ज माफियांचे ग्रामीण भागातील तरुण लक्ष्य; काजळाच्या डबीतून ड्रग्जची तस्करी

खेळण्याच्या वयात ‘थॅलेसेमिया’शी लढणाऱ्या मुलाला  प्रत्येक ३ ते ४ आठवड्यात त्याला रक्त दिले जात होते.  रक्तसंक्रमणाने मुलाला ‘एचआयव्ही’चीही बाधा झाली.  बालरोगतज्ज्ञ आणि थॅलेसेमिया आणि सिकलसेल केंद्र नागपूरचे संचालक डॉ. विंकी रुघवानी यांनी मुलावर उपचार सुरू केले. संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून मुलाला उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील ‘हेमॅटोलॉजिस्ट’ आणि ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट’ डॉ. शांतनू सेन यांच्याकडे पाठवले. मुलावर अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा निर्णय झाला. मुंबईत यशस्वी प्रत्यारोपण झाल्यावर आता मुलगा ‘थॅलेसेमिया’मुक्त झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडिलांकडूनच अस्थिमज्जा दान

‘थॅलेसेमिया’ व इतरही बऱ्याच रक्त विकारावर अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा एकच कायमस्वरूपी उपचार आहे. परंतु, या प्रत्यारोपणासाठी अस्थिमज्जा दानदाता गरजेचा आहे. थेट भावंडात ‘एचएलए’ जुळण्याची शक्यता साधारणपणे ३० टक्के असते. मुलाच्या बाबतीत, त्याच्या वडिलांसोबत १०० टक्के अस्थिमज्जाचे गुणधर्म जुळले. त्यामुळे वडिलांनी अस्थिमज्जा दान केल्यावर त्याचे प्रत्यारोपण मुलामध्ये करण्यात आल्याची माहिती डॉ. रुघवाणी यांनी दिली.