यवतमाळ : वणी शहरातील सेवानगर परिसरात पोलिसांनी छापेमारी करून भरवस्तीत सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश केला. ‘सेक्स रॅकेट’ चालविणार्‍या महिलेसह एकाला ताब्यात घेतले.

वणी शहरातील सेवानगर येथील एका घरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी कारवाईच्या सूचना केल्या. सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांनी पथकासह घटनास्थळ गाठत छापेमारी केली. त्यावेळी नागपूर येथील ३६ वर्षीय महिलेसह एका २९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.

हेही वाचा – वर्धा: भरधाव ट्रक दुभाजकास धडकला अन् आग लागून भडकला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घराची झडती घेत ४१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सेक्स रॅकेट चालवणारी महिला व वणी येथील तरुणाविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे, दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक हिरे, सागर सिडाम, सुहास, वानोळे, विजय वानखेडे, इकबाल, सतोष कालवेलकर, विशाल यांनी केली.