लोकसत्ता टीम

नागपूर: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे- फडणवीस सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी शक्यता असल्याने राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत.

काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती यांची मैत्री आणि बोगस कंपन्यात २० हजार कोटींची गुंतवणूक या मुद्दयावरून मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या मुद्यांवरून सगळे विरोधी एकत्र दिसत असताना गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावरून राजकारण ढवळून निघाले असताना शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत.

आणखी वाचा- धक्कादायक! रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७७ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार उद्या, रविवारी सकाळी मुंबईहून नागपूरला सकाळी साडेदहाच्या सुमारास येतील. येथून ते अमरावती येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राहटगाव फाटा येथील एका हॉटेलात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कृषी पदवीधर युवकांशी संवाद साधणार आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास नागपूरसाठी निघतील. आणि रात्री ८ वाजताना मुंबईकडे रवाना होतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल राहतील.