scorecardresearch

बुलढाणा : शिंदे गटाकडून ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना शुभेच्छांचा पुष्पगुच्छ!

या शुभेच्छांची वार्ता समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाली. यानंतर राजकीय वर्तुळात प्रामुख्याने सेनेच्या दोन्ही गोटात या शुभेच्छांची खमंग चर्चा रंगली.

बुलढाणा : शिंदे गटाकडून ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना शुभेच्छांचा पुष्पगुच्छ!
शिंदे गटाकडून ठाकरे गटाला शुभेच्छांचे पुष्पगुच्छ

टोकाचे वितुष्ट असलेल्या जिल्ह्यातील ठाकरे व शिंदे गटाचे राजकीय वैर वाढतच असतानाच आज शिंदे गटाकडून ठाकरे गटाला शुभेच्छांचे पुष्पगुच्छ देण्यात आले. यामुळे राजकीय क्षेत्रात प्रामुख्याने उभय शिवसेना गोटात खमंग चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>> वाशीम : गोठ्याला भीषण आग; ३९ बकऱ्या जळून राख

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचा आज वाढदिवस निष्ठावान सैनिकांनी उत्साहात साजरा केला. यात ठाकरे गटासह आघाडीतील मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. जनकल्याण संस्थान येथे उपस्थित राहून त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मात्र, दुपारी मिळालेल्या अनपेक्षित शुभेच्छा त्यांच्यासह उपस्थित समर्थकांना धक्का देणाऱ्या ठरल्या. शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह जनकल्याण मध्ये दाखल झाले. त्यांनी बुधवत यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांची वार्ता समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाली. यानंतर राजकीय वर्तुळात प्रामुख्याने सेनेच्या दोन्ही गोटात या शुभेच्छांची खमंग चर्चा रंगली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 17:37 IST