नागपूर : स्वातंत्र्य दिनी राज्यात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर ते -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत असल्याची टीका केली आहे. स्वातंत्रदिन हा विजय उत्सव आहे, तो धार्मिक सण नाही तर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला लोकांना मांसाहार करण्यास बंदी घालत आहे, अशी टीका करत आहे. सरकारमध्ये देखील याबाबत एकमत नाही. अजित पवार यांनी मांस विक्री चुकीची असल्याचे म्हटले आहे. शिंदेसेनेच्या आमदाराने देखील त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
फडणवीस सरकारने १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मांस विक्री बंदीचा आदेश काँग्रेसच्या कार्यकाळापासूनच काढला जातला जात असल्याचा दावा केला आहे. या राजकीय वादात खाटिक समाजाचे नेते म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी सरकारच्या आदेशाला थेट विरोध केला नाही. परंतु मॉलला सुट आणि छोट्या मांस विक्रेत्यांवर बंदी का, असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, आम्ही मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच बरोबर मॉल आणि मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमधून होणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवरही बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक वेळी छोट्या दुकानदारांवर अन्याय का केला जातो, असा सवलाही तुमाने सरकारला केला आहे.
खाटिक समाज, मच्छीमार, चिकन विक्रेते हे सर्व गरीब लोक आहेत. प्रत्येक वेळी त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. छोट्या खाटिकांचे दुकान बंद केले जातात. मात्र, पॅकिंग मध्ये मोठ्या हॉटेलमध्ये ते सर्व मिळते. मोठ्या मॉलमध्ये पॅकिंग स्वरूपात मिळणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवरही सरकारने बंदी घातली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
सरकारचा आदेश असेल तर मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यास आमचा विरोध नाही. मात्र फक्त गरीबांवरच बंदी लादल्या जात असेल तर त्यास आमचा विरोध असल्याचे तुमाने यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आता राज्यात महायुतीचे सरकार आहे, स्वातंत्र दिनी मांस विक्रीवर बंद ठेवायची की उघडी याचा निर्णय सरकारने घ्यावा असा सल्ला दिला. काँग्रेसच्या काळातील बंदीचा निर्णय कायम ठेवला असे सरकारचे म्हणणे असेल तर यास त्यांचीही संमती आहे असा याचा अर्थ होते असेही शिंदे यांनी सांगितले.