नागपूर – त्रिभाषा सूत्राच्या प्रश्नावर शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शिवराय यांच्या बद्दल असभ्य शब्दांचा वापर करून प्रतिक्रिया दिली होती. यामुळे संपूर्ण राज्यात शिवभक्तांच्या भावना दुखावून वाद निर्माण झाला होता. त्यावर सोमवारी संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करत विरोधक माझ्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचा दावा केला.

मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली होती. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातून आणि विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, पहिल्यांदा बरळल्यानंतर आता संजय गायकवाड यांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

….तर मी माझे शब्द मागे घेतो व मी दिलगिरी व्यक्त करतो

मी शिवभक्त असून माझं शिवप्रेम संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे माझ्या वाक्याचा अनर्थ झाल्यामुळे ज्या शिवभक्तांची भावना दुखावल्या असेल तर मी माझे शब्द मागे घेतो व मी दिलगिरी व्यक्त करत आहे असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.