वर्धा : आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात फौजदारी स्वरूपाची कारवाई करीत मेळघाटातून विद्यार्थी का आणल्या जातात, याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आश्रमशाळेत शिवम उईके रा.डोमा, ता.चिखलदरा, या सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्यू झाला. गाद्याखाली गुदमरून तो मरून पावल्याचे सांगितल्या जाते. मात्र हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा >>>एसटीचे ४५ आगार पूर्णत: बंद; मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ ‘या’ जिल्ह्याला…

भाजप आमदाराची ही आश्रमशाळा शासकीय अनुदानावर चालते. निवासी विद्यार्थ्यांवर पूर्णवेळ देखरेख ठेवण्यासाठी अधिक्षकाची नेमणूक असते. त्याचे निवासस्थान आश्रमशाळा परिसरातच असले पाहिजे, असा नियम आहे. मात्र हा अधिक्षक विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून कारंजा येथे राहायचा. जर तो आश्रमशाळेत निवासी असता तर मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्याची जबाबदारी अधिक्षकावर असती. त्यामुळे त्याला बाहेर राहण्याची परवानगी संस्थेने कशी दिली हा प्रश्न आहे.

हेही वाचा >>>नागपूर: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा बोर्गी प्रकल्प कार्यान्वित

तसेच या शाळेची पटसंख्या २९० दाखविल्या जात आहे. त्यातील २०० वर विद्यार्थी मेळघाट परिसरातील आहे. या मेळघाट परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी आश्रमशाळा आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना दूरवर कारंजा तालुक्यात शिकणासाठी पाठविण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होतो. हा प्रकार अनाकलनीय आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून संस्था व शाळा व्यवस्थापनावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी आज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना भेटून केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिष्टमंडळात संदीप भिसे, दिलीप चौधरी, सर्वेश देशपांडे, विजय कंगाले, अशोक कुंभरे, अंकुश धुर्वे, सतिश आत्राम तसेच महिला पदाधिऱ्यांचा समावेश होता. प्रशासकीय पातळीवर सुद्धा या घटनेवर चौकशी करण्याची मागणी दशरथ जाधव यांनी केली.