महेश बोकडे

नागपूर : समृद्धी महामार्गावर ३० जूनच्या मध्यरात्री जळालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसचे दुसऱ्या दिवशी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. या वृत्ताची दखल घेत यवतमाळ ‘आरटीओ’ने संबंधित पीयूसी केंद्र चालक व ट्रॅव्हल्स संचालकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करत मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.समृद्धी महामार्गावर अपघातानंतर जळालेल्या बस क्रमांक एमएच- २९, बीई १८१९ च्या संचालक प्रगती भास्कर दरणे यांना यवतमाळ आरटीओ कार्यालयाने ही नोटीस दिली.

Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

बस पूर्ण जळालेल्या अवस्थेत सिंदखेडराजा या घटनास्थळी असताना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी बसची पीयूसी कशी निघाली, या प्रकाराविरोधात आपल्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, असा प्रश्न प्रगती दरणे यांना विचारण्यात आला आहे. दरणे यांनी ५ जुलैला दुपारी १२ वाजता यवतमाळ आरटीओ कार्यालयात स्वत: उपस्थित राहून या प्रकरणाचा खुलासा करण्याचेही नोटीसमध्ये नमूद आहे. दुसरी नोटीस हे प्रमाणपत्र देणाऱ्या यवतमाळच्या राॅयल एजन्सी पी. यू. सी. केंद्र चालकाला बजावण्यात आली आहे. त्यांनाही ५ जुलैच्या दुपारी १२ वाजता आरटीओ कार्यालयात या प्रकरणाचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.