नागपूर : जन्मजात गुन्हेगारी शिक्का घेऊन जगणाऱ्या बेड्यावरील फासेपारध्यांच्या मुलांना शालेय शिक्षण मिळावे व शिक्षित होऊन सन्मानाने जगता यावे यासाठी मतिन भोसले यांनी प्रश्नचिन्ह शाळेची स्थापना करून या मुलांना ते शिक्षित करीत आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्धल प्रतिष्ठित समजला जाणारा राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंताचा जन्मदिवस अर्थात ग्रामजंयती महोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्याने समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी व उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद रोही यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन मतीन भोसले यांचा गौरव करण्यात आला. वेश्या व्यवसायात ढकललेल्या स्त्रियांच्या पुणर्वसणासाठी विमलाश्रम व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवासी शाळेची स्थापना करुन शिक्षीत करीत असलेल्या रामभाऊ इंगोले यांचा सामाजिक योगदानाबद्धल राष्ट्रसंत जिवन सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. श्रीगुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष ॲड. अशोक यावले यांनी शासन दरबारी राष्ट्रसंताच्या विचारांबाबत असलेली उदासिनता दुख:द आहे अशी खंत व्यक्त केली.

हेही वाचा : नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी जर्मनीहून!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती यांनी राष्ट्रसंताच्या विचारांचे सामाजिक अभिसरण व आचरणा व्हावे यावसाठी कृतिशिल कार्यक्रम आखावा अशी सूचना केली. संचालन प्रा.रामदास टेकाडे यांनी केले. ग्रामजंयती महोत्सवाला विठ्ठल पुनसे, सचिव, अनिल पडोळे, जावेद पाशा, लिना निकम, नाना महाराज, रुपराव वाघ, संगिता जावळे, बाळ पदवाड, सुरेंद्र बुराडे, रामराव चोपडे, देवीदास लाखे उपस्थित होते. आभार सियाराम चावके यांनी मानले.