श्वेता भट्टडने मृत्यूतील जगण्याचे पैलू उलगडले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कला सादर करणे आणि कला जगणे, हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ती कला सादर करणाऱ्यातली नाही, तर कला जगणाऱ्यातली आहे. मृत्यू डोळ्यासमोर दिसू लागल्यानंतर माणसाच्या जीवाची घालमेल होते. शेतकऱ्यांचा आत्महत्या हा केवळ मृत्यू नाही, तर त्यांच्यावर ओढवलेली ती परिस्थिती आहे. मात्र, शेवटी तो मृत्यूच आहे आणि हा मृत्यू श्वेता भट्टड ही तरुणी तिच्या कलेतून जगली आहे. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या भेटीत तिने मृत्यूतील तिच्या जगण्याचे विविध पैलू उलगडले.

‘ग्राफ आर्ट प्रोजेक्ट’ची संचालक असलेल्या श्वेता भट्टडचा मूर्तीकाम हा विशेष अध्ययनाचा विषय आहे. कदाचित म्हणूनच ती मातीशी अधिक समरस होऊन शवपेटीतसुद्धा मृत्यू जगू शकते. तिच्या या कलेचा जन्म कॅनडातून झाला असे म्हटले तर हरकत नाही. कॅनडात पाच वषार्ंपूर्वी ना नफा तत्त्वावर ‘५ंल्लू४५ी१ ्रुील्लल्लं’ी’ एक कला संघटना स्थापन झाली. या संघटनेद्वारा कलांचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करून जनजागृती निर्माण करणे हा उद्देश आहे. २०१४-२०१६ या दोन वषार्ंसाठी शांतीदूत मार्टिन ल्युथर किंग यांचे ‘्र ँं५ी ं १िींे’ हे घोषवाक्य जगातील वेगवेगळया ठिकाणी असलेल्या ९० कलाकारांना पाठवले व त्यावर आधारित त्यांचे उपप्रकल्प सादर करायला सांगितले. त्या ९० कलावंतांमध्ये भारतातील श्वेता भट्टड हिचा समावेश होता. अमेरिकेत एखादा प्रकल्प राबवण्यापेक्षा जगभरातील शेतकरी, त्यांच्या समस्या यासंबंधी एखादा प्रकल्प आपण सादर करावा असे तिला वाटले आणि तिने या विषयावर संस्थेला प्रकल्प सादर केला आणि तिची निवड झाली. ती तैवानला गेली तेव्हा तेथे तिची एका चित्रकर्तीशी भेट झाली. चर्चेतून लक्षात आले की सर्वदूर शेतकऱ्यांची अवस्था थोडय़ाफार फरकाने समानच आहे आणि हाच विषय तिने मग कॅनडाच्या प्रकल्पासाठी निवडला. भारतात दार्जिलिंग, ओडिशा, राजस्थान, हैदराबाद, नागपूर, रामटेक, नरखेड, पारडसिंगा येथे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. नागपूरला तिला हा प्रकल्प मूर्त स्वरुपात साकारण्यासाठी अलग अँगलचे संचालक, चित्रकार तसेच श्वेताचे गुरू ललित विकमसी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पाच्या सुरवातीपाूसन ते श्वेताशी जोडले गेले आहेत.

राजस्थानमध्ये अजूनही मुलींना जन्माला येण्याआधीच मृत्यूच्या दारी लोटले जाते. राजस्थानमध्ये हा कलाप्रकार सादर करण्यास गेली असताना १३ देशांतून त्या ठिकाणी व्यक्ती आल्या होत्या. त्यावेळी राजस्थानमधील काही मुलीही त्या ठिकाणी आल्या होत्या, पण या सर्व मुली इच्छा असूनही आठवीच्या पुढे शिकू शकल्या नाहीत. श्वेता स्वत: राजस्थानी असल्याने या मुलींच्या अंतर्मनातील घालमेल तिने ओळखली. त्या सर्वाना तिने एकत्र आणले आणि शेणाच्या गोवऱ्या त्यांना तयार करण्यास सांगितल्या. त्या मुलींमध्ये सुरू झालेल्या चर्चेतून त्यांची स्वप्ने तिने ओळखली आणि गोवऱ्यांवर उमटलेल्या पावलांवर तिने त्यांची स्वप्ने लिहून काढली. यावेळी त्या मुलींच्या मात्यापित्यांनी हे पाहिले तेव्हा आपल्या मुलींच्या स्वप्नांचा चुराडा आपणच केल्याचे दु:ख त्यांच्या डोळयात तरळले. आपण सादर केलेल्या कलेची हीच खरी पावती होती, असे श्वेता म्हणाली. अशा अनेक अनुभवांचे कथन तिने केले.

भारत, इटली, पाकिस्तान, जपान, तैवान, मेक्सिको, बांगलादेश, श्रीलंका अशा २६ देशांतील अशाप्रकारचे काम करणाऱ्या कलावंतांना एकत्र केले. आता ६० देशांतील कलावंतापर्यंत पोहोचण्याचा तिचा मानस आहे. हे कलावंत त्यांच्या त्यांच्या देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या स्थानिक भाषेत art farming and peace’ हे वाक्य लिहीतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta bhattad writing of farmer issue
First published on: 10-02-2016 at 08:43 IST