नागपूर : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरातील ५६० पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर स्वाक्षरीच झाली नव्हती.  आता वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित झाल्याने स्वाक्षरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्व वैद्यकीय शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी ५ जानेवारीपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे अध्यापन बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आवश्यक हजेरी, शोधप्रबंधावर मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरीसह इतर गोष्टी अडल्या होत्या. दरम्यान, विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यास वेळोवेळी मुदतवाढ दिली. याचबरोबर, शिक्षकांकडून स्वाक्षरी करून घेण्यासाठी अधिष्ठात्यांनाही सूचना केली. परंतु, अधिष्ठात्यांनी सूचना केल्यावरही कुणीच स्वाक्षरी करीत नव्हते. राज्यभरातील पदव्युत्तरच्या १ हजार २८ पैकी केवळ ४६८ विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावरच स्वाक्षरी झाली होती. इतर विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर स्वाक्षरी न झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक सत्र पूर्ण झाले नव्हते. अखेर १८ मार्चला वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीतील आश्वासनाप्रमाणे संघटनेला वैद्यकीय संचालकांकडून लेखी पत्र मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर लवकरच स्वाक्षरी होऊन हा प्रश्न सुटणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signature medical student dissertation teachers agitation suspended amy
First published on: 21-03-2022 at 00:06 IST