अमरावती: मध्‍य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्‍ह्यातील देडतलाईजवळ ट्रक आणि पीकअप वाहनाच्‍या धडकेत सहा जणांचा मृत्‍यू झाला तर ८ जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी धारणी ते खंडवा मार्गावर घडला. अपघातस्‍थळ हे धारणीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. जखमींना खंडवा येथील जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात पीकअप वाहनाचा चक्‍काचूर झाला.

हेही वाचा >>>केसीआर यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, ‘बीआरएस’ गडचिरोलीतून लढणार विधानसभा; माजी आमदार लागले गळाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धारणी ते खंडवा महामार्गावरील देडतलाई गावाजवळ अकोला जिल्‍ह्यातील अकोट येथून खंडव्‍याकडे जाणाऱ्या पीकअप वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या धडकेने पीकअप वाहनातील मजूर खाली पडले. अपघातात दोन्‍ही वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. लोकांनी बरेच प्रयत्न करून जखमींना बाहेर काढले व खंडवा जिल्हा रुग्णालयात पाठवले. सर्व मृत आणि जखमी हे खंडवा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्‍त ट्रकमधून ऊस वाहून नेला जात होता, अशी माहिती मिळाली आहे. मृतांची नावे कळू शकली नाहीत.