गडचिरोली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात अहेरी येथील माजी आमदार दीपक आत्राम यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या ५ फेब्रुवारीला नांदेड येथे होणाऱ्या सभेत ते अधिकृतरित्या बीआरएसमध्ये प्रेवश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळू शकते.

तेलंगणा राज्य निर्मितीसाठी लढा देणाऱ्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर भारत राष्ट्र समिती असे नामकरण करण्यात आले. भविष्यात विस्ताराच्या दृष्टीने या पक्षाकडून महाराष्ट्रातील काही जागा लढविण्यात येणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचा समावेश असून माजी आमदार दीपक आत्राम येत्या ५ फेब्रुवारीला नांदेड येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत, अशी माहिती आहे.

Lok Sabha elections between Narendra Modi and Rahul Gandhi and Modi will become PM for third time says Devendra Fadnavis
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस
Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Suresh Mhatre alleges that Union Minister Kapil Patil is involved in taking action on candidate godowns in Bhiwandi
भिवंडीतील उमेदवाराच्या गोदामांवर कारवाई ? केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा हात असल्याचा सुरेश म्हात्रे यांचा आरोप
narayan rane
शिंदेंची रत्नागिरीत ताकद नाही; राणेंचा दावा

हेही वाचा >>> आमदाराने मध्यरात्री छापा टाकत उघडकीस आणली वाळू तस्करी, वाचा कधी आणि कुठे ते…

दीपक आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेटदेखील घेतली होती. अहेरी विधानसभेचा बराचसा भाग तेलंगण सीमेला लागून असल्याने त्या भागात तेलगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बीआरएसने त्या भगावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळू शकते, असे राजकीय जाणकार सांगतात. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहणार, हे निश्चित.