गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गतच्या श्रीनगरातील चंद्रशेखर वॉर्ड येथील रहिवासी महिलेचा तिच्याच मुलाने खून केला. कुणीतरी अज्ञाताने आईचा खून केला आणि आपल्यालाही मारहाण केली, असा बनाव त्याने रचला. मात्र, पोलीस चौकशीत त्याचे बिंग फुटले. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

संध्या महेन्द्र कोरे (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा करण महेन्द्र कोरे (२४) याच्यासोबत काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि मुलाने रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून आईचा खून केला. त्यानंतर कुणी अज्ञाताने घरात शिरून आईचा खून केला व आपल्यालाही मारहाण केली, असा बनाव त्याने रचला.

हेही वाचा – मुंबई एटीएसकडून अकोला दंगल प्रकरणात गोपनीय चौकशी; शासनाला अहवाल सादर करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाला जखमी अवस्थेत गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज, गुरुवारी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोलिसांनी घटनेसंदर्भात त्याची विचारपूस केली. चौकशीत त्याचे बिंग फुटले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आईचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.