अकोला : जिल्ह्यातील पाणवठ्यांवर दुर्मिळ ठिपकेदार सुरमा पक्ष्यांचा वावर सुखावणारा ठरत आहे. विविध पाणवठ्यांवर पक्षीमित्रांना सुरमा पक्ष्यांच्या थव्यांनी दर्शन दिले.

विविध छंद जोपासत त्यातून आनंद अनुभवायची प्रत्येकाची आगळीवेगळी शैली असते. अनेक छंदांपैकी पक्षीनिरीक्षणाचा छंदही असाच आनंददायी असतो. सध्या शहराच्या परिसरातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. यावर्षी पाणवठ्यांवर हिवाळ्यात अनेक द्विजगणांनी तोकड्या संख्येने हजेरी लावली होती.

हेही वाचा – चंद्रपूर : कामतगुड्यात ६५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या शिला व बेसाल्ट दगड आढळले; तेलंगणाने घेतली दखल, महाराष्ट्रातील भूगर्भ वैज्ञानिकांना माहितीच नाही

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे पाहुणे पक्षी परतीचा प्रवास करतात. काही येथेच रेंगाळतात व टप्याटप्याने परततात. काही विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी सध्या कोरड्या पडणाऱ्या पाणवठ्यांवरील चिखलात दर्शन देत आहेत. तापणाऱ्या उन्हातील पक्षीमित्रांची भटकंती पक्षीनिरीक्षणातून नेत्रसुख व आनंद देणारी ठरत आहे.

हेही वाचा – “मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कोणाला भेगा पडल्या, हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठिपकेदार सुरमा असे मराठीतील गमतीदार नाव असलेला ‘स्पॉटेड रेडशँक’ पक्ष्यांचे दर्शन होत असल्याची माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी दिली. त्यांनी कॅमेऱ्यात पक्ष्यांच्या हालचाली टिपल्या. यावेळी त्यांच्यासह हंसराज मराठे, डॉ. अतुल महाशब्दे, राजेश जोशी उपस्थित होते. कापशी, कुंभारी, मोर्णा धरण, डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठ परिसरातील पाणवठ्यांवरील चिखलात सुरमा पक्ष्यांचा वावर अकोलेकर पक्षीमित्रांना एक नवीन अनुभूती देणारा ठरत आहे.