महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ४ ऑक्टोबर २०२० रोजी सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा २०२० आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या ३८ उपकेंद्रात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रत्येक जिल्ह्य़ातून बसचे नियोजन करण्याची सूचना महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना केली आहे. परंतु नागपुरात केंद्र असतानाही काही सूचना नसल्याने एसटीचे अधिकारीच संभ्रमात आहेत.

परीक्षेसाठी मुंबईत ३८ उपकेंद्रांसह नवी मुंबई आणि नागपुरातही उपकेंद्र राहणार असल्याचे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले होते.  मुंबईच्या उपकेंद्रात राज्याच्या विविध भागातून परीक्षार्थी येणार असल्याचे सांगत एसटी महामंडळाने राज्यातील प्रत्येक विभाग नियंत्रक कार्यालयांना  परीक्षार्थीसाठी  बसचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. परंतु नागपूर केंद्रात परीक्षेला येणाऱ्यांसाठी महामंडळाने काहीही स्पष्ट केले नाही. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावरून आदेश काढल्याचा संदर्भ पत्रात नमूद आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने परीक्षार्थीच्या सोयीसाठी एसटीला सूचना दिली की नाही, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबई केंद्रात जाणाऱ्या परीक्षार्थीसाठी बस फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आदेश  मिळाले आहे.  नागपुरातूनही  आरक्षण  उपलब्ध करण्याची तयारी आहे. नागपूर केंद्राबाबत आदेशात काहीच नमूद नाही.

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St department confused about upsc examinee planning abn
First published on: 16-09-2020 at 00:30 IST