नागपूर : जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी करण्यासाठी जगातील अनेक देश एकत्र आले आहेत. या समूहाला ‘अंडर टू कॉएलेशन’ असे नाव देण्यात आले आहे. जागतिक वातावरण बदल थांबवण्यासाठी हा समूह पॅरिस करारानुसार आराखडा तयार करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दशकात वातावरण बदल व त्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने या समूहात सामील होत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राला वातावरण बदल व त्याच्या परिणामांचा फार मोठा धोका आहे. गेल्या ५० वर्षांत राज्यात दुष्काळ पडण्याचे प्रमाण सात पटींनी, तसेच पूर येण्याचे प्रमाण पाच पटींनी  वाढले आहे. राज्याच्या वातावरण बदल कृती धोरणात वातावरण बदल कमी करण्यासाठी विस्तृत योजनांचा समावेश करण्यात आला आहे. २०१५ मध्ये स्थापन झालेला ‘अंडर टू कॉएलेशन’ हा समूह वातावरण बदल थांबवण्यासाठी पॅरिस करारानुसार काम करणाऱ्या २३० सरकारांचे एक जागतिक कुटुंब बनले आहे. जम्मू व काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण व पश्चिाम बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्ये या समूहात सहभागी झाली आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State involvement global warming reduction campaign akp
First published on: 04-07-2021 at 00:00 IST