गडचिरोली: पुढच्या दहा वर्षात देशाला पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही यंदा ‘चारशे पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित मेळाव्याला फडणवीस यांनी संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य रेषेच्या वर आणलं. ज्या देशात गरिबी आणि बेरोजगारी नसेल असा विकसित भारत मोदींना निर्माण करावयाचा आहे. मोदींचा १० वर्षाचा काळ हा ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे, असे सांगून फडणवीस यांनी येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वांत अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास व्यक्त केला.

Amit Shah
अमित शाहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा…”
Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
Why Nitin Gadkari said If BJP government comes will some be sent to Pakistan in front of Prime Minister Narendra Modi
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

हेही वाचा >>>खामगाव ‘एमआयडीसी’मधील जगदंबा उद्योगाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५५ वर्षे काँग्रेसचे आणि १० वर्षे मोदींचे अशी तुलना केल्यास मोदींची सत्ता देशाला विकसित भारताकडे घेऊन जाणारी ठरली. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, पीक विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे अशोक नेते यांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अशोक नेते यांचेही भाषण झाले. मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा प्रमुख किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रमोद पिपरे उपस्थित होते.