लोकसत्ता टीम

वाशीम : समृद्धी महामार्गावरील कारंजा जवळील किनखेडा परिसरात रात्री उशीरा नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या दगडफेकीत बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून दगडफेक करणारे चोर होते का? त्यांचा बस लुटण्याचा प्रयत्न होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या ताठा माठात सुरू झालेला समृध्दी महामार्ग सुरवातीपासूनच वाढत्या अपघातामुळे वादात सापडला असताना आता खासगी बसेस वर झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाश्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी १७ जून रोजी रात्री उशिरा नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची बस कारंजा जवळील किनखेड परिसरातून जात असताना बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात बसच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी सुद्धा जखमी झाले. चालकाने प्रसंगावधान राखत बस न थांबवता सुसाट कारंजा टोल नाक्यापर्यंत आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.