चंद्रपूर : जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवार सोडून आर्थिक दृष्ट्यासक्षम असलेल्या ४ हजार ४९६ माजी खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, मायावती, सिताराम येचुरी, मणीशंकर अय्यर, रेखा, चिरंजीव यांचाही समावेश आहे.

हेही वाचा… बुलढाणा: संपामुळे नागरिक फिरकेना; १३ तहसील कार्यालये ओस

भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक व्यक्तींनाही निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामुळे माजी खासदारांची आर्थिक स्थिती पाहून निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशी मागणी खा. धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्रही पाठविले.

हेही वाचा… अकोला: अल्पवयीन मुलीला पळवून नेले, वारंवार अत्याचार करून मातृत्व लादले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण ४७९६ माजी खासदार आहेत. त्यांना दरवर्षाला ५० कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून प्रदान केली जाते. यामध्ये जवळपास ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, मायावती, सिताराम येचुरी, मणीशंकर अय्यर, रेखा, चिरंजीव आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे.